पेट्रोल आणि डिझेलच्या महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली असून दोन महिन्यातील ही पाचवी दरवाढ आहे. यापूर्वी 1 जून रोजी पेट्रोल 2.58 रुपये आणि डिझेल 2.26 रुपयांनी महागलं होतं. तर त्या याआधी 17 मे रोजी पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं होतं. तर 30 एप्रिलला पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.06 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2.94 रुपयांनी वधारले होते. तसंच 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.
दरम्यान देशात 1 जूनपासून कृषी कल्याण सेस लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व्हिस टॅक्स 14.5 टक्क्यांवरुन 15 टक्के झाला आहे. मोबाईल, डीटीएच, वीज, पाणी यांचं बिल, रेस्टॉरंटमधील जेवण, रेल्वे आणि विमानाचं तिकीट, बँकिंग, विमा सेवाही महागल्या आहेत. आता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
संबंधित बातम्या