नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल 2 रुपये 16 पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेल 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त झालं आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती. मात्र, या वेळेस तेल कंपन्यांनी दरात कपात करुन ग्राहकांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, 30 एप्रिलला पेट्रोल 1 पैसे आणि डिझेल 44 पैशांनी महागलं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.

यापूर्वी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. पेट्रोल प्रति लीटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे.

संबंधित बातम्या:

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महागलं


इंधनात महा’ग’राष्ट्र, देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात!


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात