मुंबई: एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. आयसीआयसीआयनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.30% कपात केली आहे. तर एचडीएफसीनं 0.15% कपात केली आहे. याआधी भारतीय स्टेट बँकेनं देखील गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. ज्या महिलांचं सॅलरी अकाउंट आयसीआयसीआय बँकेतील आहे त्यांना 30 लाखापर्यंतचं होम लोन 8.35% ने मिळणार आहे. म्हणजेच महिलांसाठी गृहकर्ज स्वस्त असणार आहे. एचडीएफसीनं महिला ग्राहकांसाठी होम लोन 8.35% केलं आहे तर पुरुष ग्राहकांसाठी 8.40% आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या गृहकर्ज व्याजदरात किती कपात? | गृहकर्ज | व्याजदरात कपात (टक्क्यांमध्ये) |
| व्याजदरात कपात (टक्क्यांमध्ये) | 0.30% |
किती होणार बचत? | व्याजदरात कपात | गृहकर्ज | कर्जाचा अवधी | एकूण वार्षिक बचत |
| 0.30% | 20 लाख रुपये | 20 वर्ष | 4548 रुपये |
एचडीएफसीचं गृहकर्ज दर | ग्राहक | व्याजदर टक्क्यांमध्ये |
| महिला (30 लाख रुपयांपर्यंत) | 8.35% ते 8.85 % |
| अन्य (30 लाख रुपयांपर्यंत) | 8.40% ते 8.90 % |
| 30 लाख रुपये ते 75 लाख रुपये | 8.50% ते 8.90 % |
स्वस्त घर खरेदीला चालना बँकांनी गृह कर्जात केलेल्या कपातीमुळे त्याचा सर्वात जास्त फायदा स्वस्त घर खरेदीसाठी होणार आहे. सरकार स्वस्त घर खरेदीसाठी 6.50% पर्यंत व्याजदरात सब्सिडी देत आहे.