नवी दिल्ली : इंधनाच्या किमतीत मोठी कपात झाल्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या किमती 1 रुपया 12 पैसे, तर डिझेलच्या किमतीत 1 रुपया 24 पैशांनी कमी झाल्या आहेत.
16 जून म्हणजेच शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतील. 16 तारखेपासून पेट्रोलच्या किमती दररोज बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार दररोज पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र या निर्णयाला‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स’ने विरोध दर्शवला होता.
दररोज बदलणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएस द्वारे सर्वांना कळवण्याचा पेट्रोल कंपन्यांचा विचार
आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतील.
1 मे पासून उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत ऑईल कंपन्यांकडून दररोज किंमती बदलण्याचा प्रयोग सुरू आहे, ज्याची आता देशभरात अंमलबजावणी केली
जाईल.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर (रुपयांमध्ये)
मुंबई 78.44
दिल्ली 66.91
कोलकाता 69.52
चेन्नई 69.93
फरिदाबाद 67.41
गुरुग्राम 67.16
नोएडा 69.71
गाझियाबाद 69.59