पणजी: केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यामुळे गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास सारखे झाले आहेत. गोव्यात आज पेट्रोलचा दर 72 रुपये 59 पैसे प्रती लिटर तर तर डिझेलचा दर 71 रुपये 94 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला.

केंद्र सरकारने दर कपात करण्यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी गोव्यात पेट्रोल 77 रुपये 21 पैसे तर डिझेल 76 रुपये 63 पैसे दराने विकले जात होते. केंद्राने अडीच रुपये कमी केल्यानंतर 5 ऑक्टोबरला पेट्रोल 74 रुपये 90 पैसे तर डिझेल 74 रुपये 7 पैसे झाले.

केंद्राने अडीच रुपये कमी करताच गोवा सरकारने डिझेल आणि पेट्रोलवरील वॅट 4 टक्क्यांनी कमी केला. त्याची अधिसूचना 4 तारखेला काढली गेली नाही. त्यामुळे 5 तारखेला केंद्र आणि राज्य यांच्या एकत्रित दर कपातीचा फायदा गोव्यातील लोकांना मिळू शकला नाही.

गोवा सरकारने काल अधिसूचना काढल्याने काल मध्यरात्रीपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार पेट्रोल 4 रुपये 62 पैशांनी तर डिझेल 4 रुपये 69 पैशांनी स्वस्त झाले आहे. केंद्र आणि राज्य यांनी दर कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होईल असा अंदाज होता. मात्र दर कपातीनंतरदेखील स्वस्ताई 5 रुपयांचा आकडा गाठू शकली नाही. गोवा सरकारने वॅट 4 टक्के कमी केल्याने सरकारला दरमहा 5 कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

डिझेलचे दर दीड रुपयांनी कमी करण्याची घोषणा, प्रत्यक्षात 70 पैशांचाच फायदा