Petrol Diesel Rates Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग दहाव्या दिवशी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. अशातच देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तेल कंपन्यांनी मुंबईसह सर्व मोठ्या शहरांसाठी बुधवारी नवे दर जारी केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती ग्राहकांना नुकसान पोहोचवत आहेत. परंतु, हे गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये पहिल्यांदाच असं झालंय की, सलग 15 दिवस पेट्रोलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान, देशभरात आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी ऐतिहासिक उंची गाठली आहे.
देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. देशाच्या राजधानीच्या शहरात पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 101.62 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 91.71 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमती 98.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 93.26 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशातील चार महानगरांची तुलना केली, तर पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत.
देशातील प्रमुख शहरांतील दर :
शहर | पेट्रोल रुपये/लिटर | डिझेल रुपये/लिटर |
दिल्ली | 101.19 | 88.62 |
मुंबई | 107.26 | 96.19 |
चेन्नई | 98.96 | 93.26 |
कोलकाता | 101.62 | 91.71 |
भोपाळ | 109.63 | 97.43 |
रांची | 96.21 | 93.57 |
बंगळुरु | 104.70 | 94.04 |
पाटना | 103.79 | 94.55 |
चंदिगड | 97.40 | 88.35 |
लखनौ | 98.30 | 89.02 |
नोएडा | 98.52 | 89.21 |
पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर येणार? मोदी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता
एकीकडे खाद्यतेल आणि डाळींच्या वाढत्या किंमती तर दुसरीकडे शंभरीपार गेलेले इंधनाचे दर, यामध्ये सामान्य माणसाची अवस्था केविलवाणी होत असताना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार येत्या 17 तारखेला पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर देशातील पेट्रोलचे दर हे अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली 17 सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला जाईल असं अर्थमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. असं जर झालं तर पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागून त्याच्या किंमती थेट अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती
सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे.
जुलै महिन्यातील वाढ
जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).