Petrol-Diesel Price Today 26th August 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. आज सलग 95व्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मेघालय आणि महाराष्ट्र वगळता देशाभरातील सर्व राज्यांमध्ये तब्बल तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारनं 22 मे रोजी पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. 

मेघालय सरकारनं वाढवल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती 

गुरुवारी मेघालय सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये तब्बल 1.5 रुपयांची वाढ केली होती. मेघालयच्या बिरनीहाटमध्ये पेट्रोलचे दर 95.1 रुपये प्रति लिटर आणि शिलाँगमध्ये 96.83 रुपयांवर पोहोचलं आहे. राज्याचे महसूल मंत्री जेम्स पीके संगमा यांनी शेजारच्या आसाम राज्यामध्ये तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा हवाला दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नव्वदीच्या खाली आलेलं क्रूड ऑईल पुन्हा एकदा वाढलं आहे. गुरुवारी सकाळी डब्‍ल्‍यूटीआय क्रूड 93.12 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहोचलं होतं. तसेच, ब्रेंट क्रूड 99.95 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहोचलं आहे.  

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्यात गेल्या 41 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. असं असलं तरीही देशासह राज्यांत अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. 

आजचे दर काय? 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरपेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती
मुंबई106.2594.22
पुणे 10592
नागपूर 106.0392.58
नाशिक106.7493.23
हिंगोली107.2993.80
परभणी108.9295.30
धुळे 106.0592.58 
नांदेड 108.2494.71
रायगड 105.9692.47
अकोला 106.0592.55
वर्धा 106.5693.10
नंदुरबार 106.9993.45
वाशिम106. 3793.37
चंद्रपूर106.1492.70
सांगली 105.9692.54
जालना107.76 94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).