Petrol-Diesel Price Today 19 July 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी देशातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 58व्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हा इतर राज्य वगळता केवळ महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. देशाची राजधानी दिल्लीसह इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत जवळपास 2 महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नसून किमती स्थिर आहेत.  

कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी घट 

कच्च्या तेलाच्या दरांमध्ये आज पुन्हा मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये डब्ल्यूटीआई क्रूड 0.52 डॉलर म्हणजेच, 0.51 टक्क्यांची घसरणीच्या तुलनेत प्रति बॅरल 102.1 डॉलरवर आहे. तसेच, ब्रेंट क्रूड 0.53 डॉलर किंवा 0.50 टक्क्यांनी घसरल्यानंतर प्रति बॅरल 105.7 डॉलरवर कायम आहे.

देशातील इतर महानगरांतील दर काय? 

महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.  

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).