नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते. पूर्वीच्या दरांच्या तुलनेत आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा 90  रुपयांच्या पार गेले आहे. त्यामुळे मुंबईतकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.


पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर, नव्वदीपार गेले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते. पण,  आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 20 पैशांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 84.45 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 74.63 रुपये झाली आहे. तसेच मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 91.07 रुपयांवर गेली आहे. तर डिझेलची किंमत . 81.34 रुपये प्रतिलिटर झाली आहे.


देशात सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचं हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. क्रूड ऑईल प्रति बॅरल 53.50 डॉलर वर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 56.58 डॉलर प्रति बॅरलवर असल्याचं पाहायला मिळालं.


सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेल्या दरांत वाढ केली आहे. ज्यामुळे डिझेलचे आणि पेट्रोलच्या दरांच 20 पैशांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे. देशातील काही मुख्य शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे आकडे पाहिले तर ते प्रतिलीटरमागे खालीलप्रमाणं असल्याचं आढळून येतात.


दिल्ली - डिझेल 74.63 रुपये, पेट्रोल 84.45 रुपये


कोलकाता - डिझेल 78.22 रुपये, पेट्रोल 85.92 रुपये


मुंबई - डिझेल 81.34 रुपये, पेट्रोल 91.07 रुपये


चेन्नई- डिझेल 79.95 रुपये, पेट्रोल 87.18 रुपये


जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर  


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळवता येऊ शकते. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. याची माहिती तुम्हाला आयओसीएलच्या संकेतस्थळावर उपबल्ध होईल.


Fuel prices hiked | इंधनदरवाढीने गाठला 25 महिन्यांमधला उच्चांक