Petrol-Diesel Price Today 08th November, 2021 : मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करुन जनतेला दिवाळी गिफ्ट दिला. केंद्र सरकार पाठोपाठ अनेक राज्यांनीही उत्पादन शुल्कात घट केली आहे. त्यामुळे सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारांनी उत्पादन शुल्कात केलेल्या कपातीमुळं पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारनं करात कपात केली नाही, त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणाही साधला. अशातच केंद्र सरकारकडून बुधवारी डिझेलच्या दरांत 11 ते 13 रुपयांनी आणि पेट्रोलच्या दरांत 7 ते 8 रुपयांनी घट करण्यात आली होती. अशातच आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. अशातच पंजाब सरकारनंही पेट्रोलच्या किमतींमध्ये 10 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 रुपये प्रति लिटरनं कपात करण्यात आली आहे. दर कपातीची घोषणा करताना पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 70 वर्षांत असे घडलेले नाही.

यापूर्वी केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर आसाम, त्रिपुरा, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि कर्नाटक सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यासोबत हरियाणामध्येही व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अद्याप कमी करण्यात आलेला नाही.

देशातील महानगरांतील दर काय?

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई 109.98   94.14
दिल्ली 109.69   98.24
चेन्नई  104.67   89.79
कोलकाता 101.40   91.43

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).