Petrol-Diesel Price Latest Updates : भारतीय बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) दोन्हींच्या किमतींमध्ये आज बुधवारी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, सलग तिसऱ्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.16 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. घरगुती बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नसला तरी अद्यापही किमती उच्चांकी पातळीवर आहेत. 

देशातील प्रमुख शहरांतील दर : 

शहरं 

पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर)

डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई107.26 रुपये 96.19 रुपये 
दिल्ली101.19 रुपये 88.62 रुपये 
कोलकाता101.62 रुपये 91.71 रुपये 
चेन्नई98.96 रुपये 93.26 रुपये 
बंगळुरु 104.70 रुपये 94.04 रुपये 
भोपाळ109.63 रुपये 97.43 रुपये 
लखनौ98.30 रुपये 89.02 रुपये 
चंदीगढ97.40 रुपये 88.35 रुपये 

सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती 

सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे. 

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).