Petrol Diesel Price in 19 October 2022 : कच्च्या तेलाचा दर पुन्हा एकदा 90 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर आला आहे. मात्र, सध्या दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळालेला नाही. तेल कंपन्यांनी 19 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96 रुपयांवर आहे, तर मुंबई, कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. दरम्यान, देशात 22 मेपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.


आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर 


दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. 


कच्चे तेलाचे दर काय? 


ब्रेंट क्रूडच्या किमती बर्‍याच काळापासून प्रति बॅरल 95 डॉलरच्या खाली व्यवहार करत आहेत. सध्या किंमती सुमारे 90 डॉलरवर पोहोचल्या आहेत. क्रूड ऑईलच्या किमतीत सध्या अनिश्चितता असल्याचं पाहायला मिळत आहे. 30 ऑगस्टपासून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आहे. तसेच, 10 ऑक्टोबरपासून, किंमती सातत्यानं प्रति बॅरल 95 डॉलरच्या खाली आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


तेल कंपन्यांच्या वाढत्या तोट्यामुळे किरकोळ किमतींवरही परिणाम 


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत झालेल्या घसरणीचा फायदा न दाखवण्याचं प्रमुख कारण म्हणजे, तेल कंपन्यांचं होणारं नुकसान. मूडीजनं अंदाज व्यक्त केला आहे की, नोव्हेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील तीन तेल कंपन्यांचे उत्पन्न 6.5 डॉलर अब्ज ते 7 अब्ज डॉलर इतके कमी झाले आहे, जे 57 हजार कोटी रुपये इतके आहे. या तोट्यात IOC चा वाटा 3-3.2 बिलियन डॉलर आणि BPCL आणि HPCL चा वाटा 1.6 अब्ज डॉलर ते 1.9 बिलियन डॉलरच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे.


राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 


तुमच्या शहरांतील दर कसे तपासाल? 


तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.