Petrol Diesel Price Today : आज देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. इंडियन ऑईल कॉरपोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आजही दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.84 रुपये, तर डिझेलचे दर  89.87 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोल किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. इथे पेट्रोलची किंमत 102.49 रुपये लिटर, तर डिझेल 94.39 रुपये लिटर आहे. 

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलनं शंभरी केव्हाच गाठली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरीपार पोहोचल्या आहेत. तसेच मुंबई आणि हैदराबादमध्ये पेट्रोल यापूर्वीच शभरीपार पोहोचलं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी यापूर्वी 27 फेब्रुवारी 2021 रोजी डिझेलचे दर 17 पैसे प्रति लिटरनं कमी केले होते. त्यानंतर दोन महिन्यांहूनही अधिक दिवसांपर्यंत तेलाच्या किमतींमध्ये फारशी वाढ झाल्याचं पाहायला मिळाली नव्हती. मार्च-एप्रिलमध्ये डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. पाच राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालानंतर डिझेल-पेट्रोलच्या दरांत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली 

पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. 

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर : 

शहरं  पेट्रोची किंमत प्रति लिटर  डिझेलची किंमत प्रति लिटर 
दिल्ली 101.84 89.87
मुंबई 107.83 97.45
चेन्नई  102.49 94.39
कोलकाता 102.08 93.02

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).