मुंबई : सौदी अरेबियातील अराम्कोच्या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा फटका जगभरातील देशांसह भारताला बसायला सुरुवात झाली आहे. 14 सप्टेंबरच्या ड्रोन हल्ल्यानंतर असणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर प्रतिलिटर 80 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत.
गेल्या आठवड्यात एकूण सहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 1.59 आणि 1.31 रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाचे दर चढे राहिल्यास येत्या काळात आणखी दरवाढीची भीती व्यक्त होतं आहे. इंधनाच्या किमती वाढ झाल्यास त्याचा परिणाम इतर जीवनावश्य वस्तूंवरही होतो.
कच्च्या तेलाची टंचाई लक्षात घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राखीव इंधन वापरण्यास परवानगीची माहिती यापूर्वीचं ट्वीट करत दिली आहे. "सौदी अरेबियातील इंधन शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ल्यानंतर तेलाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजारातील इंधनाचा पुरवठा नियंत्रित राहावा यासाठी राखील तेल वापरण्याची परवानगी देण्यात आलीआहे", असं ट्रम्प यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई
पेट्रोल - 79.29 रुपये
डिझेल - 70.01 रुपये
वसई विरार
पेट्रोल - 79.43 रुपये
डिझेल - 68.96 रुपये
पालघर
पेट्रोल - 80.22 रुपये
डिझल - 69.72 रुपये
पुणे
पेट्रोल - 79.33 रुपये
डिझेल - 68.88 रुपये
कोल्हापूर
पेट्रोल - 79.84 रुपये
डिझेल - 69.41 रुपये
सिंधुदुर्ग
पेट्रोल - 80.81 रुपये
डिझेल - 70.34 रुपये
नाशिक
पेट्रोल - 80.02रुपये
डिझेल - 69.56रुपये
सोलापूर
पेट्रोल - 80.58 रुपये
डिझेल - 70.79 रुपये
जळगाव
पेट्रोल – 80.62 रुपये
डिझेल – 70.14 रुपये
अकोला
पेट्रोल - 79.39 रुपये
डिझेल - 69.17 रुपये
अहमदनगर
पेट्रोल - 79.38 रुपये
डिझेल - 68.94 रुपये
मनमाड
पेट्रोल - 79.38 रुपये
डिझेल - 68.35 रुपये
परभणी
पेट्रोल - 81.51 रुपये
डिझेल - 70.99 रुपये
वर्धा
पेट्रोल - 79.89 रुपये
डिझेल - 69.46 रुपये
यवतमाळ
पेट्रोल - 80.67 रुपये
डिझेल - 70.21 रुपये
सांगली
पेट्रोल - 79.53 रुपये
डिझेल - 69.09 रुपये
हिंगोली
पेट्रोल – 80.55 रुपये
डिझल – 70.10 रुपये
धुळे
पेट्रोल – 79.48 रुपये
डिझेल - 69.05 रुपये
गडचिरोली
पेट्रोल - 80.38 रुपये
डिझेल - 69.95 रुपये
चंद्रपूर
पेट्रोल - 79.65 रुपये
डिझेल - 69.24 रुपये
गोवा
पेट्रोल - 69.63 रुपये
डिझेल - 67.41 रुपये
मुंबईत पेट्रोलचे दर ऐंशीच्या घरात, डिझेलही महागलं, सहा दिवसात दोन रुपयांची वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2019 12:17 PM (IST)
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाचे दर चढे राहिल्यास येत्या काळात आणखी दरवाढीची भीती व्यक्त होतं आहे. इंधनाच्या किमती वाढ झाल्यास त्याचा परिणाम इतर जीवनावश्य वस्तूंवरही होतो.
(Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -