पणजी : देशातील नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरदे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला आहे. मोनिका या मूळच्या महाराष्ट्राच्या असून त्यांची गोव्यात निर्घृण हत्या करण्यात आली.

गोव्यात भाड्यानं घेतलेल्या घरात त्यांचं वास्तव्य होतं आणि याच घरी हातपाय बांधलेल्या नग्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. 39 वर्षीय मोनिका यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर शारीरिक अत्याचारही झाले होते का, याचा पोलिस तपास करत आहेत.

गुरुवारी मोनिका यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे.

मोनिका या जे.जे स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थिनी होत्या आणि परफ्यूम इंडस्ट्री मध्ये येण्याआधी त्यांनी फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही काम केलं आहे.