नवी दिल्लीः तुम्ही अशा लांबच लांब रांगा देव दर्शनासाठी किंवा रेल्वेच्या तात्काळ तिकिटासाठी पाहिल्या असतील. मात्र या रांगा रिलायन्स जिओचा फोन घेण्यासाठी लागल्या आहेत. देशभरातील रिलायन्स जिओच्या डिजीटल एक्स्प्रेस स्टोअर्समध्ये मोफत 4G सिम मिळवण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत.


 

रिलायन्स जिओने काही स्मार्टफोन्ससाठी खास 4G ऑफर आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री 2 वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत. सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, एसुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.

 

काय आहे जिओची ऑफर?

 

रिलायन्स जिओ 4G सेवेची चाचणी करत आहे. यासाठी रिलायन्स LYF ब्रँडच्या सर्व फोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा देत आहे. जिओ सिम सक्रिय झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही ऑफर आहे.

 

या ऑफरसोबतच जिओकडून प्रिमियम अॅप सेवा देखील देण्यात येत आहेत. जिओ प्ले, जिओ एक्स्प्रेस न्यूज, जिओ ड्राईव्ह,  जिओ सिक्युरिटी आणि जिओ मनी अशा ऑफर्स सुरु आहेत. जिओ ऑन डिमांड ऑफरअंतर्गत टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही आणि गाण्यांसाठी बीट्स उपलब्ध आहेत.

 

असं मिळवा जिओ सिम

 

  • गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं.

  • त्यानंतर get jio sim>agree>get jio offer>location>next button>

  • ही प्रोसेस केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला भेट द्या.