नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीची परिस्थिती सध्या नाजूक असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शांततेचे आवाहन केले आहे. दिल्लीतील हिंसेच्या मागे काही राजकीय नेते, समाजकंठकी आणि बाहेरच्या लोकांचा हात असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल म्हणाले, हिंसाचारामध्ये हेड कॉन्स्टेबल पोलिस शहीद झाले आहे. शहीद कुटुंबाप्रमाणे रतनलाल यांच्या कुटुंबाला दिल्ली सरकातर्फे एक कोटीची मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रतनलाल यांच्या परिवरातील एक सदस्याला नोकरी देखील देण्यात येणार आहे. तसेच हिंसाचारात मृत्यू झालेल्यांना दोन लाखांची आणि जखमींना पन्नास हजारांची मदत करण्यात येणार आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात दिल्लीबाहेरील लोकांचा हात असून सामान्य नागरिकांचा संबंध नाही. दिल्लीची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की, सरकार तुमची काळजी घेईल. मी तुम्हाला फक्त हे विचारतो की, दिल्लीमध्ये या घटना का घडल्या? दिल्लीतील लोक शांततेने जगायला आवडते.
Majha Vishesh | दिल्ली होरपळली... कुणाला तीची वेदना कळली?
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, आम्हाला दंगली नको आहेत. दिल्लीतील मुलांचे भविष्य घडवावे लागेल. दिल्लीच्या सामान्य माणसाने हे केले नाही. काही बाह्य घटकांनी, काही राजकीय घटकांनी आणि काही निर्लज्ज घटकांनी हे केले आहे. या लोकांमुळे दिल्लीचे काही भाग ज्वलंत आहेत.
रंधवा म्हणाले, सध्या दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणालाही घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्याना कोणतीही तक्रार करायची असेल तर त्यांनी112 या हेल्पलाईनवर संपर्क करु शकतात. दरम्यान, त्यांनी जनतेला अफवा न पसरवण्याचही आवाहन केलं आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 18 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून 106 जणांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल.
संबंधित बातम्या :
Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा