मुंबई : जगभरातील Zomato Paytm, Disney Plus, Sony Live, Play Station Network (PSN) यूजर्सना गुरुवारी रात्री अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इंटरनेट ट्रॅकर डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ही समस्या सुरू झाली. पाच मिनिटातच सुमारे तीन हजार लोकांना केवळ झोमॅटो अॅप्स आणि साईट्स ओपन करता आल्या नाहीत. Akamai वेब इन्फ्रास्ट्रक्चर बंद झाल्यामुळे अशी अडचण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
अशाच प्रकारे इतर सेवांसाठीही समस्या येत होती. डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार, डिस्ने + हॉटस्टार, ZEE 5 आणि सोनी लाईव्ह सारख्या स्ट्रीमिंग सर्विसेससना आऊटेजचा प्रॉब्लेम झाला. झोमॅटो, Amazon आणि पेटीएम सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशा अडचणी ग्राहकांना येत होत्या.
सेवा लवकरच सुरू होईल - पेटीएम
देशातील लाखो लोक ऑनलाईन पेमेंटसाठी पेटीएम अॅप वापरतात. मेट्रोचे तिकिट बुक करण्यापासून ते वीज बिले भरण्यापर्यंत लोक या अॅपचा वापर करतात. परंतु ऑनलाईन पेमेंट अॅप पेटीएम यूजर्सना गुरुवारी रात्री पेमेंट करताना अचानक अडचणींचा सामना करावा लागला. पेटीएम अॅप उघडताच Sorry, the service is currently unavailable. Please try again letter असा मेसेज यूजर्सना दिसत होता.
तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत, असं पेटीएमने ट्वीट करत म्हटलं. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वतः पेटीएममध्ये यूजर्सना अडचण येत असल्याचं सांगितलं.
Paytm व्यतिरिक्त FedEx, Paytm Money, NDTV, Cricinfo, Cricbuzz, Hotstar, SonyLiv, Airbnb, Hsbc या साईट्सनाही ओपन होण्यात अडचणी येत होत्या.