Paytm Down Today: आज सकाळी देशभरात पेटीएम सेवा (Paytm Service) डाउन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पेटीएम वरून डिजिटल पेमेंट करण्यात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी पेटीएमला ट्विटरवर सांगितले की, त्यांचे खाते अ‍ॅपवरूनच लॉग आउट झाले आहे. पेटीएम सेवा बंद असल्याने आज सकाळपासूनच लोकांचे पैसे ट्रान्सफर होत नव्हते. यावर पेटीएमच्या वतीने ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.






पेटीएमने स्पष्ट केले
काही वेळानंतर पेटीएम कंपनीच्या वतीने ट्विटरवर माहिती देण्यात आली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, अ‍ॅपमध्ये नेटवर्क त्रुटीमुळे अनेकांना लॉग इन करण्यात अडचण आली आणि अनेकांना पेमेंटही करता आले नाही.


 






लोकांना करावा लागला अडचणींचा सामना 
याबाबत पेटीएम युजर्सचे म्हणणे आहे की, सध्या आम्हाला पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत, तसेच अ‍ॅपवरूनच खाते लॉग आउट करण्यात आले आहे. पेमेंट करताना सेशन टाइम आउट असे दिसत आहे.


संपूर्ण देशभरात सेवा बंद
माहितीनुसार, आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील याची पुष्टी केली आहे की, भारतभर पेटीएम युजर्सना अनेक समस्या येत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे.