पासपोर्ट सेवा अॅपच्या माध्यमातून देशातील कोणताही नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करु शकतो. अॅपवर दिलेल्या पत्त्यावरच पोलीस व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशननंतर पासपोर्ट अॅपवर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवला जाईल, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.
पासपोर्ट सेवा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुषमा स्वराज यांनी ही घोषणा केली. पासपोर्ट सेवा अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. या अॅपच्या माध्यमातून पासपोर्टसंबंधित इतर अनेक कामंही करता येऊ शकतात. पासपोर्टसाठी आता विवाह प्रमाणपत्र आणि घटस्फोटीत महिलांना पतीचं नाव लावण्याची सक्ती नाही, असंही सुषमा स्वराज म्हणाल्या.
नुकताच उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला एका अधिकाऱ्याकडून पासपोर्ट नाकारण्यात आला. मुस्लीम धर्मीय पतीला धर्म बदलायला सांगितलं गेल्याचंही बोललं जात होतं. हे सर्व प्रकरण समोर येताच पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. तसंच त्या हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला पासपोर्टही देण्यात आला होता.
या मुद्द्यावरुन सुषमा स्वराज यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र सुषमा स्वराज यांनी ट्रोलर्सना विनम्र भाषेत उत्तर देत ही मोठी खुशखबर दिली आहे.
संबंधित बातम्या :
‘तन्वी सेठ पोलिसांशी खोटं बोलल्या’ ; पासपोर्ट प्रकरणाला नवं वळण
...म्हणून सुषमा स्वराज यांनी ट्रोलर्सचेही ट्वीट रिट्वीट केले
पासपोर्टच्या नियमात 5 दिलासादायक बदल, धावपळ कमी होणार!
तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार