Passengers with Single Name on Passport : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पासपोर्टवर पूर्ण नाव नसेल तर तुम्हाला यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये ( UAE ) प्रवास करता येणार नाही. इंडिगो एअरलाइन्सने UAE अधिकार्यांच्या हवाल्याने एक निवेदन जारी केले आहे. यानुसार पासपोर्टवर एकच नाव असलेले म्हणजे पूर्ण नाव नसलेल्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सोमवारी 21 नोव्हेंबर 2022 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
इंडिगोनो जारी केलेल्या नवीन निवेदनानुसार, प्रवाशाच्या पासपोर्टवर सिंगल नेम म्हणजे फक्त नाव असेल तर त्याला युएईमध्ये प्रवास करता येणार नाही. व्यक्तीच्या पासपोर्टवर किमान दोन शब्द असलेलं नाव असणं गरजेचं असेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या पासपोर्टवर फक्त 'समीर' किंवा आमिर असं एक शब्दाचं नाव असेल, तर त्या पासपोर्टवर तुम्हाला युएईमध्ये प्रवेश मिळणार नाही. पासपोर्टवर तुमचं पूर्ण नाव असणं किंवा किमान दोन शब्द असणं गरजेच आहे. एकच नाव असणारे प्रवासी किंवा पर्यटक यांना परवानगी दिली जाणार नाही.
संयुक्त अरब अमिरातीने इंडिगो एअरलाइन्सला याबाबतील सूचना दिल्या आहेत की, एकच नाव असणाऱ्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. 21 नोव्हेंबर 2022 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. दरम्यान, स्थायी नागरिक किंवा कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या निमयातून सूट देण्यात येणार आहे. इंडिगो एअरलाइनने प्रवाशांना त्यांच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यास किंवा अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइट hwpadkpahw.bwu ला भेट देण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, या निर्णयमागचं कारण युएई प्रशासनाने सांगितलेलं नाही आहे. इंडिगो कंपनीला युएईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्टवर समान नाव असलेल्या आणि निवास परवाना किंवा कायमस्वरूपी व्हिसा असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. इंडिगो एअरलाइन्सने UAE अधिकार्यांच्या हवाल्याने एक निवेदन जारी केले आहे. यानुसार पासपोर्टवर एकच नाव असलेले म्हणजे पूर्ण नाव नसलेल्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
निवेदनानुसार, या नवीन नियमांमधून काही प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये ज्या प्रवाशांकडे वैध निवासी व्हिजा आणि पासपोर्ट आहे, ज्यांच्याकडे कामानिमित्तचा व्हिसा आहे, अशा प्रवाशांना या नियमामधून सूट मिळणार आहे. त्याशिवाय ज्या व्यक्तींनी व्हिसामध्ये किंवा पासपोर्टमध्ये नावाच्या दोन्ही रकान्यांमध्ये आपलं नाव अपडेट केलं असेल. त्यांनाही या नियमातून सवलत असेल.