Coronavirus Cases Today in India : गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची संख्या घटताना पाहायला मिळत आहे. मात्र आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. देशात 408 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेने आज कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, तर गेल्या 24 तासांत पाच रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात चार कोटीहून अधिक जणांना कोरोना संसर्ग झाला असून त्या पैकी अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशात पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


भारतात 5 हजार 881 सक्रिय रुग्ण 


देशात सध्या 5 हजार 881 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 70 हजार 483 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत देशात 5 लाख 30 हजार 601 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक रुग्णांना इतरही आजार होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी नवी आकडेवारी जाहीर केली आहे.






कोरोना संसर्गात किंचित वाढ 


देशात आज कोरोना संसर्गात किचिंत वाढ झाली आहे. देशात बुधवारी 360 कोरोना रुग्ण आढळले होते, तर आज गुरुवारी 408 कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज तुलनेनं 48 रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान कोरोनाबळींचे प्रमाण सारखेच आहे. कालही पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता, आजही पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


चीनमध्ये 32 हजार नवीन कोरोना रुग्ण


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. चीनमध्ये एका दिवसात 32 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये सरकार पुन्हा एकदा नवे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत असतो. अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सरकार पुन्हा एकदा झिरो कोविड धोरण लागू करणार आहे.


मुंबईमध्ये गोवरचा धोका वाढता


एकीकडे कोरोना रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे मुंबईत गोवरचा संसर्ग (Measles Disease) वाढत आहे. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोवरमुळे एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील गोवरचा संसर्गाच्या बळींची संख्या 12 वर पोहोचली आहे.