Air India Express Flight : मस्कत येथून कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे  इमर्जंसी लँडींग करण्यात आलं. एयर इंडिया एक्सप्रेस (Air Indian Express Flight) IX-442, VT-AXZ  या विमानात 141  प्रवासी होते. उड्डाणापूर्वी धूर निघू लागल्याने विमानातून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.


विमानातून अचानक कसा धूर  आला याची चौकशी सूरू आहे. उड्डाणापूर्वी धूर निघल्याने मोठा अनर्थ टळला. विमानातील प्रवाशांना सुखरू  खाली उतरवण्यात आले आहे. त्यानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. या अगोदर 25 ऑगस्टला देखील सिडनी येथून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आळे आहे. एका 50 वर्षाच्या प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास झाला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्लाईडचा वापर करण्यात आला होता. प्रवाशांनी एमर्जन्सी स्लाईडच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते. 


विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ने सांगितले की, इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेस मस्कट येथून कोचीन येथे रवाना होणार होती. सर्व प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. या घटनेची चौकशी सुरू असून या प्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे.






 


उड्डाणाआधी झाली होती विमानाची तपासणी


विमान उड्डाणाच्या आधी सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली होती. आयसोलेशन मॅन्युल, ऑन-ग्राउंड इंजिनियरिंगची तपासणी करण्यात आली होती. इंजिन ग्राउंड, रन इंजिन आणि ऑक्झिलरी पॉवर युनिट (APU) या दोन्हींच्या ऑपरेशनसह सर्व तपासण्या केल्या गेल्या. तपासणीवेळी कुठूनही धूर निघत नव्हता.