SpiceJet Flight Incident : विमानांमधील गैरवर्तनाच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. सहप्रवाशी महिलेल्या अंगावर लघवी केलेले प्रकरण ताजे असतानाच आज स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाने केबिन क्रूसोबत गैरवर्तन केले आहे. यावेळी केबिन क्रू महिलेला अक्षरश: रडू कोसळलं होत. तरी देखील तो प्रवाशी तिच्यासोबतच गैरवर्तन करतच होता. या घटनेनंतर आरोपी प्रवासी आणि त्याच्या सहप्रवाशाला विमानातून खाली उतरवून सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले. स्पाइसजेट एअरलाइन्सच्या दिल्ली-हैदराबाद फ्लाइटमध्ये आज म्हणजे 23 जानेवारी रोजी ही घडली आहे. दिल्लीत बोर्डिंग दरम्यान एका प्रवाशाने केबिन क्रूला त्रास देत बेजबाबदार आणि अयोग्य वर्तन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  


स्पाइसजेटने  दिलेल्या माहितीनुसार, केबिन क्रूने पीआयसी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. हा प्रवासी आणि त्याच्या सहप्रवाशाला या घटनेनंतर विमानातून खाली उतरवून सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये फ्लाइटमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. 






यापूर्वी 5 जानेवारी रोजी नवी दिल्ली ते गोवा या GoFirst फ्लाइटमध्ये दोन परदेशी प्रवाशांनी एका महिला फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. परदेशी प्रवाशांनी एका एअर हॉस्टेसला त्यांच्यासोबत बसण्यास सांगितले होते. त्यावेळी दुसऱ्या एअर हॉस्टेसला ते प्रवाशांनी अश्लील शब्दात संबोधले. दोन्ही प्रवाशांना विमानतळ सुरक्षा एजन्सी सीआयएसएफकडे सोपवण्यात आले आणि या प्रकरणाची माहिती नियामक डीजीसीएला कळवण्यात आली. 


दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केल्याची घटनाही समोर आली होती. 26 नोव्हेंबर रोजी शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका वृद्ध महिला प्रवाशावर लघवी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला दिल्ली पोलिसांनी बेंगळुरू येथून अटक केली. सध्या हा संशयित न्यायालयीन कोठडीत आहे. याशिवाय पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली होती. 


महत्वाच्या बातम्या


Air India Flight Pee Case : टॉयलेटमध्ये सिगारेट प्यायला, नंतर महिलेच्या ब्लँकेटवर लघवी गेली, एअर इंडियाच्या फ्लाईटमधील दुसरी घटना