Tripura Flight News: गुवाहाटीहून अगरतळाला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे. या प्रवाशाने अमली पदार्थांच्या नशेत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. एवढच नाही तर  यानंतर सहप्रवाशांनी या प्रवाशाला मारहाण देखील  केली. विमानामध्ये घडलेल्या प्रकरानंतर विमानात भितीचे वातावरण निर्माण झाले.  मारहाणीचा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव बिस्वजीत देबनाथ आहे. तो इंडिगोच्य हैदराबादहून  गुवाहटीला जाणाऱ्या विमानाने अगरतलाचा प्रवास करत होता. विमान जेव्हा लँड होणार होते त्यावेळी तो अचानक दरवाजाच्या दिशेने धावत गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान  फ्लाईट क्रू मेंबर त्याला थांबवले आणि मोठा अनर्थ ठरला.


संतापलेल्या प्रवाशांची आरोपीला मारहाण


रिपोर्टनुसार बिस्वजीत देबनाथ फ्लाईटचा दरवाजा उघडण्यासाठी त्या दिशेने गेले त्यावेळी विमानातील एअरहॉस्टेसची नजर त्याच्यावर गेली. एअरहॉस्टेसने लगेच प्रवाशाला पकडले आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला मागे ओढले. त्यानंतर आरोपी क्रू मेंबर गैरवर्तन केले आणि वारंवार दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची गैरवर्तणूक पाहून संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला आहे.


आरोपी रुग्णालयात दाखल 


अगरतळा येथे विमानतळावर पोहचल्यानंतर इंडिगो स्टाफबरोबरच सीआयएसएफ जवानांनी आरोपीला देखील वाचवले आणि एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आरोपीची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्याने अंमली पदार्थाचे सेवन केले होते. प्रवाशाला मारहाण करताना क्रू लीडर चंद्रिम चक्रवर्ती आणि मनीष जिंदाल हे देखील गंभीर जखमी झाले. 


विमान प्रवासात गोंधळ घातल्याचे सातवे प्रकरण


विमान प्रवासात गैरवर्तन केल्याचे हे सातवे प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वी 11 मार्चला रत्नाकर द्विवेदी या अमेरिकी नागरिकाने लंडन- मुंबई प्रवासादरम्यान सिगरेट ओढण्यास मनाई केल्यानंतर त्याने जबरदस्तीने एमर्जन्सी एग्झिटचा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंर त्याला अटक करण्यात आली. 14 मार्चला प्रवाशाची  25 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा अमेरिकेला गेला. 


प्रवाशांच्या असभ्य वर्तनानंतर धोरणात बदल


महत्त्वाची बाब म्हणजे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA) टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला (एअर इंडिया) गेल्या काही दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. सुधारित धोरणात नेमका काय बदल झालाय, हे अद्याप सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाही. 


हे ही वाचा :


 गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इंडिगोची खास ऑफर, सणासुदीच्या काळात हवाई प्रवास स्वस्त