Parliament Monsoon Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पावसाळी अधिवेशनात (Monoon Sesion) एकूण 18 बैठका होणार असून 24 विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं रविवारी 17 जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत (All Party Meeting)  विरोधी पक्षांनी सुमारे 25 मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी (PM MOdi) गैरहजर होते या मुद्द्यावरुन काँग्रेसनं भाजपला घेरत, खिल्ली उडवली आणि काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं. 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती (Presidential Election) आणि उपराष्ट्रपती (Vice Presidential Election) या दोन्ही महत्त्वाच्या घटनात्मक पदांसाठीही निवडणुका होणार आहेत. 


संसदेच्या अधिवेशनात या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता 


रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत 36 पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजप (BJP), काँग्रेस (Congress), टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, सपा, बसपा, आरजेडी इत्यादी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, विरोधकांकडून 25 मुद्द्यांवर चर्चेची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 13 मुद्दे त्यांच्या पक्षानं मांडले आहेत.


विरोधकांनी ज्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली आहे, त्यात महागाई, अग्निपथ योजना, बेरोजगारी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि घसरत चाललेल्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिती यासारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.


या विधेयकांवर चर्चा होईल, असा विरोधकांचा आरोप 


राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सरकार अग्निपथसह सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार आहे. दुसरीकडे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं आपल्या वतीनं सांगितलं की, संसदेत चर्चेसाठी 32 विधेयकं ठेवण्यात आली असून त्यापैकी 14 तयार आहेत. यामध्ये The Multi State Cooperative Societies ( Amendment ) Bill 2022 , The Ancient Monuments & Archaeological Sites & Remains ( Amendment ) Bill , Central Universities ( Amendment ) Bill आणि Press & Registration of Periodicals Bill 2022 यांसारख्या महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे. सरकारनं घाईगडबडीत विधेयकं मंजूर केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. 


जयराम रमेश यांच्या ट्वीटनं खळबळ, प्रल्हाद जोशींचं प्रत्युत्तर 


सर्वपक्षीय बैठक सुरू असताना काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्वीट करून वाद सुरु केला. बैठकीत जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या गैरहजेरीवरून सरकारवर निशाणा साधत हे असंसदीय नाही का, असा सवाल केला. 


बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि विचारलं की, मनमोहन सिंह पंतप्रधान असताना किती सर्वपक्षीय बैठकांना गेले होते, तर काही प्रसंगी पंतप्रधान मोदींनी बहुतांश सभांना हजेरी लावली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच संसदीय शब्दांची मार्गदर्शक तत्त्वे आणि रविवारी निषेध निदर्शनाशी संबंधित नोटीसवरून वाद झाला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.