नवी दिल्ली : Unique Identification Authority of India (UIDAI) कडून आधारच्या माध्यमातून देशातील नागरिकांना 12 अंकांचा एक कोड देण्यात येतो. या 12 क्रमांकाचा कोड असणाऱ्या आधार कार्डच्या माध्यामातून व्यक्तीची ओळख, पत्ता आणि अनेक ठिकाणी पुराव्यासाठी वापर करत महत्त्वाचं कामं मार्गी लावण्यात येतात. इथं लक्ष घेण्याजोगी बाब म्हणजे नवजात बालकांसाठीच्या आधार कार्डसाठी बायोमेट्रिक पद्धतीने अर्ज करण्याची गरज नाही. 


नवजात बालकांसाठी आधार कार्डचा अर्ज करताना त्यासाठी demographic पद्धतीचा वापर केला जातो. नवजात बालक पाच वर्षांचे होताच बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर केला जातो, तर वयाच्या 15 व्या वर्षी फेशियल फोटोग्राफीच्या वापरातून आधारसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 


In Pics : पत्नीचे दागिने विकून रुग्णांसाठी 'त्या' रिक्षाचालकानं रिक्षाची केली रुग्णवाहिका 


नवजात बालकाच्या आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 


- सर्वप्रथम uidai.gov.in या  UIDAI च्या संकेतस्थळावर भेट द्या. 
- यानंतर होम पेजवर 'Aadhaar Card Registration' या लिंकवर क्लिक करा. 
- पुढे बाळाच्या माहितीचा तपशील, पालकांचा दूरध्वनी क्रमांक, त्यांचा ईमेल आयडी जोडा. 
- प्राथमिक माहितीनंतर बाळाशी संबंधित पत्ता, वस्ती, जिल्हा, राज्य आणि इतर माहिती भरावी. 
- यानंतर 'Fix Appointment' या टॅबवर क्लिक करावं. 
- यानंतर तुम्ही नवजात बालकाच्या आधार कार्डसाठीच्या नोंदणीसाठीची तारीख निवडू शकता. 
- सदर प्रक्रियेसाठी तुम्ही नजीकच्या आधार नोंदणी केंद्राची निवड करु शकता. 


नवजात बालकाच्या आधार नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जात नाहीत. यावेळी नवजात बालकाच्या जन्मतारखेबाबत मात्र बालकांनी योग्य ती काळजी घेतच माहितीचा तपशील भरावा.