नवी दिल्ली : पहिला नीटचा पेपर फुटला (NEET Paper Leak), नंतर नेटचा पेपर फुटला (NET Paper Leak) आणि देशभरात विद्यार्थी वर्गांत पुन्हा एकदा असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. पेपर फुटण्याची किंवा कोणतीही परीक्षा वादात सापडण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अनेक वेळा असे घडलं आहे. त्यानंतर पेपर रद्द तरी झाले किंवा त्यावर समिती बसून तपास करण्यात आला. गेल्या 7 वर्षांमध्ये 15 राज्यांमध्ये पेपरफुटीचे 70 प्रकरणे समोर आली आहेत.


यावेळी NEET UG परीक्षा 24 लाख मुलांनी दिली आणि पेपरफुटीचा त्यांना फटका बसला. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्याची केसदेखील न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील कोणत्या राज्यांमध्ये पेपरफुटीच्या सर्वाधिक घटना घडल्या ते पाहुयात, .


राजस्थानमध्ये सर्वाधिक पेपरफुटीच्या घटना


इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांत राजस्थानमध्ये सर्वाधिक पेपर लीक झाले आहेत. राजस्थानमध्ये सात परीक्षांचे पेपर फुटले असून त्याद्वारे 40,590 पदे भरायची होती. त्यामुळे याचा फटका 38 लाख 41 हजार उमेदवारांना बसला.


मध्य प्रदेश आणि तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर


पेपर लीक प्रकरणात तेलंगणा आणि मध्य प्रदेश संयुक्तपणे राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये 5 पेपर लीक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तेलंगणामधी भरती परीक्षांद्वारे एकूण 3,770 पदे भरायची होती आणि यामुळे 6,74,000 उमेदवार अडचणीत आले होते. मध्य प्रदेशातही एकूण 5 प्रकरणे नोंदवली गेली ज्याद्वारे 3,690 पदांवर भरती करायची होती. 1,64,000 उमेदवारांना या पेपरफुटीचा फटका बसला.


उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर


पेपर लीक प्रकरणात उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1,800 पदांच्या भरतीसाठी असलेले चार पेपर फुटले होते. या परीक्षेसाठी 2,37,000 उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते, त्यामुळे सर्वांना याचा फटका बसला.


गुजरात चौथ्या क्रमांकावर


पेपर फुटीमध्ये गुजरात आणि बिहार ही दोन राज्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. बिहार आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये पेपर लीकची एकूण तीन प्रकरणे समोर आली आहेत. बिहारमध्ये 24,380 आणि गुजरातमध्ये 5,260 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. बिहारमधील सुमारे 22 लाख 87 हजार उमेदवारांना याचा फटका बसला. तर गुजरातमध्ये या परीक्षांमध्ये सुमारे 16 लाख 41 हजार उमेदवारांना पेपरफुटीचा फटका बसला. 


जम्मू आणि काश्मीर पाचव्या स्थानावर


पेपर फुटीच्या या यादीतील पुढचे नाव जम्मू-काश्मीरचे आहे. या राज्यांत एकूण 3 पेपर लीक प्रकरणे नोंदवली गेली ज्याद्वारे 2,330 पदांवर भरती होणार होती. या परीक्षांसाठी 2,49,000 उमेदवारांनी अर्ज केले होते आणि त्या सर्वांना याचा फटका बसला. 


ही बातमी वाचा: