Pankhuri Shrivastava : ग्रॅबहाऊसच्या संस्थापक पंखुरी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastava) यांचे नुकतेच वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाले. 24 डिसेंबर रोजी पंखुरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. खूप कमी वयात उद्योग क्षेत्रात भरारी घेतलेल्या पंखुरी यांच्या निधनाने कुटुंबासह नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंखुरी यांच्या निधनानंतर आता त्यांची निधनाआधीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. 


पंखुरी श्रीवास्तव यांनी 2012 मध्ये पंखुरी रेंटल स्टार्टअप ग्रॅबहाऊसची स्थापना केली होती. 2016 मध्ये आॅनलाईन क्सासीफाईल कंपनी क्विकरने त्याची खरेदी केली. त्यानंतर पंखुरी यांनी महिलांवर फोकस करण्याच्या प्लॅटफाॅर्मवर 'पंखुरी"ला 2019 मध्ये लाँच केले. 


अत्यंत कमी वयात पंखुरी श्रीवास्तव यांनी उद्योग क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. 24 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. निधनाच्या आधी एक दिवस म्हणजे 23 डिसेंबर रोजी पंखुरी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. "एका तासाच्या मुलाखतीत एखाद्या उमेद्वाराच्या क्षमता आणि त्याचे मुल्यांकन करणे कठीण आहे. सर्वच उमेदवारांनी एसकारखे लेख वाचले. त्यामुळे चांगले काम करणार्‍या आणि सारख्या भाषा बोलणार्‍या कंपन्यांकडून सारख्याच गोष्टी जाणून घेतल्यासारखे वाटले. असे म्हणत रेफ चेक हा एकमेव मार्ग आहे का? असा प्रश्न पंखुरी यांनी उपस्थित केला आहे. 




पंखुरी यांनी सिकोइया इंडियाच्या अॅक्सलेरेशन कार्यक्रमांतून 3.2 मिलियन डॉलरची रक्कम जमवली होती. पंखुरी यांनी पहिल्या रेंटर स्टार्टअप ग्रॅबहाऊसची स्थापना केली होती. 


छोट्या शहरातून सुरूवात
उत्तर प्रदेशमधील झांसी येथे राहणाऱ्या पंखुरी 25 व्या वर्षी झासीहून मुंबईत दाखल झाल्या. त्यावेळी मुंबईत भाडेतत्वार घर घेण्यासाठी अत्यंत कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. ब्रोकर्सना खूप पैसे द्यावे लागल्यानंतर त्यांच्या डोक्यात कल्पना आली की, अशीच एखादी कंपनी सुरू केली तर काय होईल, जी घर शोधण्यात लोकांना मदत करेल. त्यानंतर त्यांनी 20 हजार रूपयांच्या भांडवलावर ग्रॅबहाऊसची सुरूवात केली. या कंपनीची वर्षाची उलाढाल 720 कोटीपर्यंत पोहोचली होती. 2016  मध्ये आॅनलाईन क्सासीफाईल कंपनी क्विकरने ग्रॅब हाऊसची खरेदी केली. 


महत्वाच्या बातम्या