नवी दिल्ली : जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या बँक खात्याला पॅन (परमनन्ट अकाऊंट नंबर) जोडला नसेल, तर 28 फेब्रुवारीपर्यंत अकाऊंटला पॅन जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करा. कारण आयकर विभागानेच तसे आदेश दिले आहेत. ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल, त्यांना फॉर्म-60 भरुन द्यावा लागेल.
पॅन कार्ड न जोडल्यास काय कारवाई?
काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी आयकर विभागाने पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा नियम लागू केला आहे. आयकर विभागाच्या अधिसूचनेत याबाबत कोणताही खुलासा नाही की, 28 फेब्रुवारीपर्यंत बँक खात्याला पॅन कार्ड न जोडल्यास काय कारवाई होईल. असं असलं तरी, सुरतमधील एका बँकेने पॅन कार्ड जोडले नसलेल्या अकाऊंटचे व्यवहार रोखले आहेत. ज्यांनी पॅन कार्ड जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली, त्यांचे व्यवहार सुरळीत केले जात आहेत.
साधारणत: जन धन खाते, बेसिक अकाऊंट आणि विशेष रुपाने उघडले जाणारे टाईम डिपॉझिट वगळता सर्व बँक खात्यांसाठी आता पॅन बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, काही जुन्या बँक खात्यांना पॅन कार्ड जोडलेले नाहीत.
जुने बँक खाती ज्यावेळी उघडली गेली, त्यावेळी पॅन कार्ड बंधनकारक नव्हतं. त्यामुळे अशा खात्यांमध्ये 50 हजार किंवा त्याहून अधिकच्या रकमेचा व्यवहार झाल्यास त्यांना फॉर्म-60 भरावा लागत असे.
बँक आणि टपाल खात्यांमध्ये 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान बचत खात्यात अडीच लाख किंवा त्याहून अधिक रक्कम जमा झाली असल्यास, त्याची माहिती 15 जानेवारीपर्यंत द्यावी लागेल. शिवाय, चालू खात्यावर 12 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम जमा झाली असल्यास, तपशील द्यावा लागेल.
नोटाबंदीआधीचा तपशीलही आयकर विभागाकडून विचारला जाणार आहे. हा तपशील विचारण्याचं कारण म्हणजे नोटाबंदीच्या आधी काळा पैसा खातेधारकाने आपल्या खात्यावर जमा केला आहे का, याची चौकसी आयकर विभाग करणार आहे.
नोटाबंदीदरम्यान कमीशनवर रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे वृत्त समोर आल्यानंतर आयकर विभागने नोटाबंदी आधीच्या तपशीलाची चौकशी करण्याचेही ठरवले आहे.
Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
बँक खात्याला पॅनकार्ड जोडणं बंधनकारक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2017 08:10 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -