पॅन कार्ड हे भारतातील महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. बँकेसंदर्भात महत्वाच्या कामांसाठी याची आवश्यकता आहे. तसेच, याचा उपयोग प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी, जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी केला जातो. पण बर्‍याचदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो, की पॅनकार्ड एखाद्याचे नागरिकत्व सिद्ध करते की नाही किंवा कोणताही परदेशी नागरिक आणि परदेशी कंपनी पॅन कार्ड काढू शकते का? याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करुयात.


पॅन कार्ड का आवश्यक आहे?


पर्मनन्ट अकाऊंट नंबर म्हणजे पॅन कार्ड (PAN Card) आयकर विभागाने दिलेला दहा-अंकी दस्तऐवज आहे. पॅन कार्डमुळे कोणतीही व्यक्ती किंवा कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यास मदत होते. याशिवाय आयकर विवरणातही याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.


पॅनकार्ड एखाद्याच्या नागरिकतेचा पुरावा आहे का?


पॅनकार्ड एखाद्याच्या नागरिकतेचा पुरावा ठरू शकते चुकीचे आहे. पॅनकार्ड हे कुणाच्याही नागरिकतेचा पुरावा होऊ शकत नाही. कर भरणारा कोणताही परदेशी नागरिक किंवा परदेशी कंपनी पॅनकार्ड काढू शकते.


पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा?



  • तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यात Services ऑप्शनमध्ये PAN सेक्शन उपलब्ध आहे. यावर क्लिक करा. 

  • तुम्ही थेट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html लिंकवर जावू शकता.

  • येथे तुम्हाला अॅप्लिकेशन टाइपची डिटेल्स द्यावी लागेल. भारतीय नागरिकांसाठी Form 49A फॉर्म भरावा लागेल. पुन्हा कॅटेगरीत individual सिलेक्ट करावे लागेल.

  • यानंतर आपले नाव, जन्म तारीख, कॉन्टॅक्ट डिटेल्स आदी माहिती भरा.

  • यानंतर CAPTCHA कोड भरून Submit बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा टोकन नंबर जनरेट होईल.

  • त्यानंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. ज्यात तीन पर्याय देण्यात येतील. यासाठी तुम्हाला पॅनकार्डसाठी सबमिट करावे लागेल.
    e-KYC आणि e-sign चा वापर करून डिजिटली डॉक्युमेंट्स सबमिट करू शकतात. किंवा तुम्ही फिजिकली सुद्धा डॉक्यूमेंट्स सबमिट करू शकता.

  • सर्व सूचना वाचून नेक्स्ट बटनावर क्लिक करा.

  • पुढे अॅड्रेस प्रूफ आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यावी लागेल.

  • त्यानंतर आपले असेसिंग ऑफिसर AO सेलेक्ट करावा लागणार आहे. या पेजवर तुम्हाला संबंधित माहिती मिळेल. सर्व डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा.

  • ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारीख. आता तुम्हाला फोटोग्राफ आणि साइन अप अपलोड करावे लागेल. पुन्हा सबमिट करावे लागेल.

  • अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक फोनवर एक ओटीपी येईल. येथे एन्टर केल्यानंतर रिसिटला प्रिंट करून ठेवा. 

  • यामध्ये 15 अंकाचा एक्नॉलिजमेंट नंबर असणार आहे. या रिसिटला साइन करा. तसेच NSDL ऑफिस मध्ये किंवा पोस्ट कुरियद्वारे पाठवू शकता. अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर 15 दिवसात तुम्हाल पॅन कार्ड मिळेल.