नवी दिल्ली: पीओकेवरील सर्जिकल स्ट्राईकवरुन तणावाचे वातावरण असताना पंतप्रधानांडून सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पाकिस्तानी ट्रॉलमध्ये उदो उदो होतोय.


ट्विटरवर केजरीवालांसाठी बनवण्यात आलेले हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्ये एकीकडे देशभरातून केजरीवालांना कडवा विरोध होतोय. तर दुसरीकडे पाकिस्तानी ट्रॉलनी त्यांना डोक्यावर घेतलंय.

सध्या ट्विटरवरु फक्त केजरीवालांचीच चर्चा असून एक कोटीहून अधिकजण या ट्विटर हॅण्डलरनी अॅक्टिव्ह आहेत . #PakStandsWithKejriwal या नावाने बनवण्यात आलेल्या या हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये भारतातून केजरीवालांवर तिखट प्रतिक्रीया येत आहेत. तर पाकिस्तानमध्ये मात्र त्यांचा उदो उदो होत आहे.


केजरीवालाविरोधातील काही प्रतिक्रीया

  • एका ट्विटर यूजर्सने म्हटलंय की, जर पाकिस्तानात निवडणुका झाल्या, तर 'आप'ला नवाज शरीफ आणि इमरान खानपेक्षा जास्त जागा मिळतील.


  • एकाने तर केजरीवालांच्या डोक्यावर पाकिस्तानच्या झेंड्याचे चिन्ह असलेली टोपी घातली आहे.

  • काहींनी केजरीवालांनी हाफिज सईदचा लूक दिला आहे. तर एका ट्रॉलरने केजरीवाल हाफिज सईदला नमस्कार करताना दाखवले आहेत.


  • काहीजण तर त्यांना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांच्या स्थानी दाखवलं आहे.


  • विशेष म्हणजे, रावळपिंडीतील एका ट्विटर यूजर्सने आम्ही सत्याच्या सोबत आहोत असं म्हटलं आहे.