नवी दिल्लीः दहशतवाद्यांना भारताच्या सीमेत घुसण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडूनच कशी मदत केली जाते, त्याची पोलखोल झाली आहे. सीमेवरील इन्फ्रारेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चार दहशतवाद्यांना भारताच्या सीमेत घुसण्यासाठी मदत करतानाची दृष्य कैद झाली आहेत.


दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेली ही दृष्य जुलै महिन्यातील चोरगली बॉर्डर येथील आहेत. दहशतवाद्यांना मात्र भारतीय जवानांच्या नजरेतून निसटता आलं नाही. 11 जुलै रोजी पहाटे पावणे तीन वाजता ही घुसखोरी झाली.

दहशतवादी सीमेत घुसखोरी करत असल्याची माहिती भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला दिली. मात्र पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय जवानांचा हा दावा गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केलं. त्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांवर दबाव आणल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांना घटनास्थळावरुन पळून जाण्यास मदत केली.