India-Pakistan Border : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack)  भारत आणि पाकिस्तानमध्ये (India-Pakistan) तणावाची परिस्थिती कायम आहे. अशातच शेजारील देशाविरुद्ध सतत कारवाई केली जात आहे. दरम्यान,राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफने (BSF) एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे. शनिवारी (3 मे 2025) ही अटक करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितलंय. त्यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानी रेंजरला राजस्थान फ्रंटियर फोर्सने या रेंजरला ताब्यात घेतले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला ताब्यात घेतल्यानंतर एका आठवड्याहून अधिक काळानंतर ही घटना घडली आहे. या हल्ल्यात 26 लोक ठार झाले, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. 

बीएसएफने नोंदवला निषेध 

दरम्यान, बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना २३ एप्रिल रोजी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आणि भारतीय सैन्याच्या तीव्र विरोधानंतरही त्यांनी त्यांना ताब्यात देण्यास नकार दिला.पंजाबमध्ये चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर एका जवानाला अटक केल्याबद्दल बीएसएफने पाकिस्तान रेंजर्सकडे निषेध नोंदवला आहे.

पाकिस्तान देत ​​नाहीये बीएसएफ जवानाची माहिती

यापूर्वी, अनवधानाने सीमा ओलांडण्याच्या अशा घटना दोन्ही बाजूंनी तातडीने सोडवल्या गेल्या होत्या, परंतु यावेळी पाकिस्तानी बाजू सैनिकाचा ठावठिकाणा आणि त्याच्या परतीच्या तारखेबद्दल काहीही सांगत नाही, हे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे असू शकते, असे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, पाकिस्तान रेंजर्सना निषेध पत्र पाठवण्यात आले आहे परंतु त्यांनी सैनिक कुठे आहे आणि परत येण्याची तारीख याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. 

दोन्ही बाजूंमध्ये सुमारे ४-५ ध्वज बैठका झाल्या आहेत, परंतु त्यांच्या परतण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवानाला लाहोर-अमृतसर सेक्टरमधील रेंजर्स तळावर नेण्यात आले आहे आणि लवकरच त्याला बीएसएफच्या स्वाधीन केले जाऊ शकते. ते म्हणाले की रेंजर्सनी मौन बाळगले आहे आणि त्यांनी निषेध पत्र जारी केलेले नाही किंवा त्याची स्थिती कळवले नाही. 

हे ही वाचा