मोहम्मद हनीफ गुल नावाच्या या अधिकाऱ्याने 730 दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला आहे. नवे रेल्वे मंत्री शेख राशिद अहमद यांच्यासोबत काम करणं अशक्य आहे, कारण त्याचं वर्तन योग्य नाही, असं त्यांनी अर्जात म्हटलं आहे.
हनीफ गुल हे पाकिस्तान रेल्वेमध्ये ग्रेड-20 चे अधिकारी आहेत. हनीफ रेल्वेमध्ये मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. अर्जात त्यांनी लिहिलं आहे की, "नव्या मंत्र्यांची वृत्ती अव्यावसायिक असून, त्याचं वर्तन योग्य नाही. पाकिस्तानच्या नागरी सेवेतील एक सन्मानित सदस्य म्हणून मला त्यांच्या हाताखाली काम करणं शक्य नाही. त्यामुळे कृपया मला 730 दिवसांची रजा द्या."
दरम्यान, निवडणुकांनंतर राशिद अहमद यांनी 20 ऑगस्ट 2018 रोजी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
सोशल मीडियावर विशेत: ट्विटरवर हनीफ गुल यांच्या सुट्टीचा अर्ज चर्चेचा विषय बनला आहे. पाकिस्तानात अनेकांनी त्यांचा हा अर्ज शेअर केला आहे. तर एवढ्या दिवसांच्या सुट्टीसाठी काहींनी हनीफ यांच्यावर टीकाही केली आहे.