पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 12:31 PM (IST)
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आता एलओसीवर तणाव कमी करण्याबाबत चर्चा करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) नासिर जंजुआ यांनी रविवारी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. डोभाल आणि जंजुआ यांच्यात दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासंदर्भात बातचीत झाली. याआधी पाकिस्तानी मीडियाने परराष्ट्र विषयांवर पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांच्या हवाल्याने दावा केला होता की, "जंजुआ आणि डोभाल यांच्यात एलओसीवर तणाव कमी करण्यासंदर्भात सहमती झाली."