नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचं MI-17 चॉपर हे लढाऊ विमान जम्मू काश्मीरच्या बडगाममधील कलान गावात आज सकाळी कोसळलं. मात्र त्यानंतर पाकिस्ताननं आमच्या लढाऊ विमानांनी हे चॉपर पाडल्याच्या उलट्या बोंबा ठोकण्यास सुरुवात केली होती.

पाकिस्तानच्या मीडियातही या बातम्या सर्रासपणे दाखवल्या जात होत्या आणि मोठ्या बढाया मारल्या जात होत्या. मात्र काही तासातच पाकिस्ताननं बडगाम दुर्घटनेतील चॉपर आम्ही पाडलं नसल्याचं कबूल केलं आहे.

पाकिस्तानचे लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या काही भागांमध्ये बॉम्ब हल्ला केला. मात्र कोणतंही नुकसान करणं आमचा उद्देश नव्हता. आमच्या सेनेतही दम आहे, हे आम्हाला भारताला दाखवायचं होतं.

पाकिस्तानी विमानांनी भारतातील 6 ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. आम्ही बॉम्ब हल्ला करुन काहीही करु शकतो आणि पाकिस्तानची ताकत आम्हाला दाखवायची होती, असा हास्यास्पद दावा गफूर यांनी केला.

पाकिस्तान युद्धाच्या विरोधात असून शांती कायम राहिली पाहिजे, असंही गफूर यांनी म्हटलं. भारतानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडल्याचं मात्र गफूर यांनी अमान्य केलं. आम्ही एफ-16 या विमानाचा आमच्या ऑपरेशनमध्ये वापर केलाच नव्हता, असं गफूर यांनी म्हटलं.



भारतीय वायुसेनेचं MI-17 चॉपर दुर्घटनाग्रस्त

भारतीय वायुसेनेचं MI-17 चॉपर हे लढाऊ विमान जम्मू काश्मीरच्या कलान गावात कोसळलं आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान जमिनीवर कोसळलं. जमिनीवर कोसळल्यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं.

व्हिडीओ- पाकिस्तानच्या विमानांना वायुसेनेनं पिटाळून लावलं




संबंधित बातम्या

पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही

भारतीय लढावू विमानांना सज्ज राहण्याच्या सूचना, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू

पाकिस्तानी विमानांची भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी, बॉम्ब टाकल्याचीही शक्यता

एअर स्ट्राईक : देशभरात हाय अलर्ट, मुंबई-अहमदाबादसह प्रमुख शहरांत वाहनांची तपासणी

पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, लोकवस्तीत लपून ग्रेनेड हल्ले, भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे काही रेंजर्स ठार