जम्मू : भारतीय वायुसेनेचं MI-17 चॉपर हे लढाऊ विमान जम्मू काश्मीरच्या कलान गावात कोसळलं आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या विमानाने श्रीनगर विमानतळावरुन उड्डाण केलं होतं.


काही वेळातचं विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान जमिनीवर कोसळलं. जमिनीवर कोसळल्यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. दरम्यान श्रीनगर विमानतळावरुन प्रवासी विमानांची हवाई वाहतूक रोखण्यात आली आहे. विमानांची वाहतूक अमृतसरच्या मार्गे वळवण्यात आली आहे.


जम्मू काश्मीर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने वायुसेनेच्या विमानांची नेहमीच रेलचेल असते. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ला आणि कालच्या पाकिस्तानवरील 'एअर स्ट्राईक'नंतर परिसरातील हवाई हद्दीत भारतीय वायुसेनेने गस्त वाढवली आहे.


व्हिडीओ - जम्मू काश्मीरमध्ये वायुसेनेचं विमान कोसळलं