नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर सुरु असलेला पाकिस्तानचा थयथयाट सुरुच आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताला धडा शिकवण्याची वेळी आली असल्याचं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं.


पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी काश्मीरचा मुद्दा पुन्हा पुढे आणला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने काही हालचाली केल्या तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, असं इम्रान खान यांनी म्हटलं.





भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्या त्याला संपूर्ण जग आणि संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. आमचे सैनिक तयार आहेत, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही हालचाली केल्यास चोख उत्तर देऊ, असं इम्रान खान यांनी म्हटलं.



काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राजनैतिक संबंधांचा दर्जा घटवणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं होतं. याशिवाय पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही परत बोलावण्याच्या निर्णय घेतला होता. या सर्व निर्णयांचा पाकिस्तानमधील जनतेला मोठा फटका बसत आहे.


संबंधित बातम्या