इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) उद्या इस्लामाबादमध्ये राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इमरान खान यांच्यावर पक्षासाठी परदेशातून पैसा गोळा करून स्वतःसाठी वापरल्याचा आरोप आहे. यासाठी सोमवारी त्यांना अटक केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.
खरे तर शुक्रवारीच इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता, पण संसदेचे कामकाज लवकर संपल्याने अविश्वास प्रस्ताव मांडला गेला नाही. आता 4 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादमध्ये त्यांनी एका रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत इम्रान खान राजीनामा देऊन निवडणुकांची घोषणा करू शकतात असे म्हटले जात आहे.
इम्रान खान राजीनामा देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. इमरान खान यांनी मी कोणाच्याही दबावात येऊन राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. इमरान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर 3 आणि 4 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून नोटिस मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान खान उद्या स्वत:ला शक्तीशाली नेता म्हणून सिद्ध करण्यासाठी रॅलीतून शक्ती प्रदर्शन करणार आहे.
संबंधित बातम्या :