Pakistan New Conspiracy: पाकिस्तानच्या कुरापती थांबायचं नाव घेत नाहीयेत. भारताविरुद्ध नेहमी काही ना काही षडयंत्र करत पाकच्या नापाक हरकती सुरुच असतात. आता पाकिस्तानच्या एका नवीन षडयंत्राबाबत माहिती समोर आली आहे. गोपनीय कागदपत्रांच्या आधारे अशी माहिती समोर आली आहे की,  ड्रोननंतर आता हँड ग्लायडिंगच्या माध्यमातून पाकिस्तान भारतविरोधी कुरापती करण्याच्या विचारात आहे. पाकिस्ताननं नवीन दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.  


पाकच्या नवीन षडयंत्राची माहिती समोर 


दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान आता हँड ग्लायडिंगची ट्रेनिंग देत आहे. या हँड ग्लायडिंगच्या मदतीनं 600 मीटर ते 1200 मीटरपर्यंत 16 किलो स्फोटक किंवा अन्य कोणतीही सामग्री पाठवली जाऊ शकते. तसेच महत्वाच्या संस्थांवर एक किलोमीटरच्या अंतरावरुन हल्ला देखील केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी भारत पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्ससोबत चिनी सैन्य एक्सपर्ट दिसून आले होते. त्यामुळं पाकिस्तानला चीन मदत करतंय का? असा सवाल देखील उपस्थित केला गेला होता. 


अफगानिस्तानातून 8000 दहशतवादी पाकिस्तानी कॅम्पात परतले  
हिमवृष्टीच्या दरम्यान दहशतवाद्यांना हँड ग्लायडिंगच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची ट्रेनिंग दिली जात असल्याची माहिती मिळाली आहे. अफगानिस्तानमध्ये आतापर्यंत वास्तव्यास असलेले 8,000 दहशतवादी विविध कॅम्पमध्ये परतले आहेत. भारत सरकारनं  एंटी ड्रोन सिस्टिमसाठी आठ कंपन्यांशी संपर्क केला आहे.  


बीएसएफच्या माहितीनुसार मागील एका वर्षात 67 वेळा पाकिस्तानी ड्रोन भारतीय सीमेवर आणि हद्दीत  67 वेळा ड्रोन दिसून आला आहे. ड्रोनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आतापर्यंत कुठलीही परिणामकारण सिस्टिम आपल्याकडे नाही.  दरम्यान पाकच्या या कुरापतींवर आता भारताकडून काय उत्तर दिलं जातंय याकडेही लक्ष लागून आहे. 


या बातम्याही नक्की वाचा-


Abhinandan Awarded Vir Chakra : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं विमान पाडलं, भारताचा ढाण्या वाघ अभिनंदन यांना वीर चक्र!