नवी दिल्लीत कारगिल विजय दिनाच्या 20 व्या वर्षपूर्तीनिमित्त समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख बिपीन रावत उपस्थित होते. यावेळी कारगिलमधल्या शहिदांना मानवंदना देण्यात आली. कारगिलच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सैन्याला मानवंदना दिली. सरकार येतात जातात मात्र सैनिक हा अमर असतो असे मोदी म्हणाले. शिवाय पाकिस्तानला दिलेल्या आजपर्यंतच्या धोबीपछाडाचीही आठवण करुन दिली.
मोदी म्हणाले की, काश्मीरबाबत पाकिस्तानची सर्व धोरणं कपटी होती. त्यांनी नेहमीच कटकारस्थानं रचली. 1948, 1965, 1971 मध्ये त्यांनी कटकारस्थानं रचली होती. परंतू आपण ती उधळून लावली. 1999 मध्ये आपल्या जवानांनी त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली.