पंजाबमधील (Punjab) गुरदासपूरच्या पंजग्रेन भागात बीएसएफने (BSF) पाकिस्तानी सीमेजवळ (India-Pakistan border) ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर ड्रोन (drone attack) पुन्हा पाकिस्तानी सीमेवर गेले. पंजाबमधील निवडणुकांपूर्वी (punjab election 2022) आरडीएक्स (RDX) आणि बॉम्बस्फोटकांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा मोठा कट ड्रोनद्वारे उधळला गेला आहे. 


ड्रोनमधून पडली दोन पाकिटे


पंजाबच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये, बीएसएफने सुमारे 5 किलो आरडीएक्स आणि डिटोनेटरसह मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा गुरदासपूर सेक्टरमधील पंजग्रेन भागात पाकिस्तान सीमेवरील काटेरी तारांजवळ ड्रोनचा आवाज ऐकू आला. अलर्ट बीएसएफ जवानांनी ड्रोनवर तात्काळ गोळीबार केला, त्यानंतर ड्रोन पुन्हा पाकिस्तानी सीमेवर गेला, मात्र त्यापूर्वीच दोन पाकिटे काटेरी तारांजवळील शेतात फेकून देण्यात आली. स्निफर डॉगच्या मदतीने बीएसएफ जवानांनी दोन्ही पाकिटे जप्त केली. 


5 किलो RDXसह बॉम्ब बनवण्याचे साहित्य
बीएसएफच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला पिवळ्या रंगाच्या दोन पॅकेटमध्ये ड्रग्ज असल्याचा संशय होता. पण एका पॅकेटमध्ये ते पिस्तुलासारखे दिसत होते. त्यामुळेच BDS म्हणजेच बॉम्ब निकामी पथकाला पहाटेच घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही पाकिटे उघडण्यात आली. पहिल्या पॅकेटमध्ये सुमारे 2.5 किलो आरडीएक्स स्फोटक, दोन नायलॉन दोर, एक टायमर, तीन इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, पोलराइज्ड सेल, तीन स्टीलचे कंटेनर, स्प्लिंटरसाठी बॉल बेअरिंग, एक लाकडी फ्रेम आणि एक पॅकिंगमध्ये एक लाख रुपये सापडले. तर दुसऱ्या पॅकेटमध्ये 2.10 किलो आरडीएक्स, एक चायनीज पिस्तूल, 13 पिस्तुल राउंड, एक टायमर, कमर्शियल कॉर्डेक्स, तीन इलेक्ट्रिक डिटोनेटर (एक तांबे आणि दोन अॅल्युमिनियम), तीन स्टीलचे कंटेनर, दोन पोलराइज्ड सेल, एक पॅकिंग फोम, एक लाकडी चौकट, एक किलोपेक्षा जास्त सायकलचा गोळा सापडला. 


पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला निवडणुका
पंजाबच्या सीमेवर शस्त्रे, दारूगोळा आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन आणि यूएव्हीचा वापर केला जातो. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत, मतदानापूर्वी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केल्याने पाकिस्तानकडून निवडणुकीपूर्वी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. गेल्या काही काळापासून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयएस (ISIS) पुन्हा एकदा शीख फॉर जस्टिस आणि बब्बर खालसा या दहशतवादी संघटनांना हवा देण्याचा कट रचत आहे.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha