चंदीगढ : अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड बॉम्ब हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं समोर येत आहे. हल्ल्यात वापरलेला ग्रेनेड हे HE-36 सीरिजचे आहेत. या प्रकारचे ग्रेनेड पाकिस्तानी लष्कर वापरतं, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी झाले होते. हल्ला पाकिस्तानातून घडवून आणल्याचं तपासात समोर आलं आहे. या हल्ल्यामागे नव्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं बोललं जात आहे.
या हल्ल्यानंतर गृहमंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली आहे, रॉ, आयबीसह गृहमंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी याबैठकीला उपस्थित होते.
या प्रकरणानंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनआयएची 3 सदस्यीय समितीने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. तर हल्लेखोरांबद्दल माहिती देणाऱ्यास 50 लाख रुपये बक्षीसाची घोषणाही पंजाब सरकारने केली आहे.
काही दिवसापूर्वी पंजाबमध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दहशतवादी घुसल्याची आणि अल-कायदा कमांडर जाकिर मुसाच्या हालचालींची माहिती मिळाली होती. मुसा अमृतसरमध्ये असल्याची माहिती मिळताच, पंजाब पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अमृतसर बॉम्ब हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2018 04:02 PM (IST)
या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी झाले होते. हल्ला पाकिस्तानातून घडवून आणल्याचं तपासात समोर आलं आहे. या हल्ल्यामागे नव्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं बोललं जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -