नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी तपास पथकाचा अहवाल लीक झाला आहे. या अहवालातून अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानी जेआयटीचं अहवाल कथित स्वरुपात लीक झालं आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तांनुसार, ‘भारत का ड्रामा’ असा उल्लेख पाकिस्तानी तपास पथकाने पठाणकोट हल्ल्याच्या अहवालात केला आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून एक तपास पथक पठाणकोट हल्ल्यासंदर्भात तपासासाठी भारतात आलं होतं. या तपास पथकाचा अहवाल पाकिस्तानी मीडियामध्ये लीक झाला आहे. पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी पठाणकोटमध्ये हल्ल्याचा ड्रामा केल्याचं लीक झालेल्या अहवालात म्हटलं आहे.
तपास पथकाच्या लीक झालेल्या अहवालात स्पष्ट म्हटलं गेलं आहे की, पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. शिवाय, भारतीय अधिकाऱ्यांनी तपास पथकाला सहकार्य केलं नसल्याचा गंभीर आरोप अहवालातून भारतावर करण्यात आला आहे.
येत्या काही दिवसांतच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पठाणकोट हल्ल्यासंदर्भातील हा अहवाल सुपूर्द केला जाणार आहे.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/717177451965644801
विरोधक आक्रमक
आता यावरुन भारतातील विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. अरविंद केजरीवालांनी ट्वीट करुन भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार घणाघात केला आहे. “मुँह में राम बग़ल में छुरी। BJP/RSS वाले मुँह से “भारत माता की जय” बोलते है और ISI को बुलाकर भारत माता की पीठ में छुरा भोंक देते हैं.” असा ट्वीट अरविंद केजरीवालांनी केला आहे. शिवाय, “मोदी जी ने ISI को बुलाकर भारत माता के साथ बहुत बड़ा धोखा किया है। पता नहीं मोदी जी और नवाज़ में क्या डील हुई है” असेही केजरीवाल म्हणाले.