Pahalgam Terrorist Attack श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेत स्थानिक युवक सय्यद आदिल हुसैन शाह (Syed Adil Hussain Shah) याच्यावर देखील दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. सय्यद आदिल हुसैन शाह पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करत होता. दहशतवादी समोर आल्यानंतर आदिल शाह यानं धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला.
आदिल हुसैन घोड्यावरुन पर्यटकांना सफर घडवायचा. त्यानं एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. सय्यद आदिल हुसैन शाह पर्यटकांना कार पार्किंग पासून बैसारन म्हणजेच मैदानापर्यंत घेऊन जायचा. सय्यद आदिल हुसैन शाह यानं दहशतवाद्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, या दरम्यान दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली. आदिल हुसैन शाह यानं त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबात कमवणारा एकुलता एक व्यक्ती
रिपोर्टनुसार आणि सय्यद आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबामध्ये पैसे कमावणारा तो एकमेव व्यक्ती होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 व्यक्तींचा मृत्यू झाला ज्यात दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. पहलगामच्या घटनेत मृत्यू झालेला सय्यद आदिल हुसैन शाह एकमेव व्यक्ती होती. त्याच्या पश्चात कुटुंबात वयस्कर आई वडील, पत्नी, मुलं आहे. सय्यद आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबीयांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.
दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे : सय्यद हैदर शाह
आदिल शाहचे वडील, सय्यद हैदर शाह यांनी एएनआयशी संवाद साधला, ते म्हणाले माझा मुलगा काल पहलगाममध्ये काम करण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास आम्हाला तिथं हल्ला झाल्याची माहिती मिळाली. आम्ही त्याला फोन केला मात्र त्याचा फोन स्विच ऑफ होता. सायंकाळी 4.40 वाजता त्याचा फोन सुरु झाला मात्र त्यावेळी कुणीच उत्तर दिलं. आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा आम्हाला सय्यद आदिल हुसैन शाह याला देखील गोळी लागल्याची माहिती मिळाली. सय्यद हैदर शाह यांनी ज्यांनी हा दहशतवादी हल्ला केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं म्हटलं.
या घटनेनंतर परिसरात शोकाकूल वातावरण आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आदिल शाह यानं स्वत:ची पर्वा न करता दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचं धाडस आणि शौर्य नेहमीच लक्षात ठेवलं जाईल, असं स्थानिकांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली2) संजय लेले - डोंबिवली3) हेमंत जोशी- डोंबिवली4) संतोष जगदाळे- पुणे5) कौस्तुभ गणबोटे- पुणे6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू2) सुबोध पाटील3) शोबीत पटेल