नवी दिल्ली: केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यामध्ये परदेशात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या एकूण चार व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये 17 जणांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. त्यापैकी मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला आणि गुगलच्या सुंदर पिचाई यांचा समावेश आहे.
त्याचसोबत ब्रिटनचे नागरिक परंतु भारतीय वंशाच्या डॉ. प्रोकर दासगुप्ता आणि आयर्लंडच्या रुतगेर कॉर्टनहस्ट यांचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
चौघांना पद्मभूषणकला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तसेच जनरल बीपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील 10 जणांचा गौरवमहाराष्ट्रातील 10 व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, सोनू निगम, विजयकुमार डोंगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी मार्च वा एप्रिल या महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक यांचा समावेश असतो.
संबंधित बातम्या :
- Padma Awards : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर; जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण
- Padma Awards : मित्रा, तुझा अभिमान वाटतोय; पद्मभूषण मिळाल्यानंतर शरद पवारांनी केलं वर्गमित्राचं अभिनंदन
- Padma Awards : प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री, महाराष्ट्रातील 10 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव