पहिल्यांदाच 'पद्म' सामान्य मानकरींना, सत्तास्थानांना नाही : मोदी
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2017 09:54 PM (IST)
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 'पद्म' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आठवड्याभराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर भाष्य केलं आहे. दरवेळी जसा सत्तास्थानांचा सन्मान होतो, तसं न करता यावर्षी पहिल्यांदाच सामान्य मानकरींचा पद्म पुरस्कारांनी गौरव करण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले. एनडीएतील घटकपक्षांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद्म पुरस्कारार्थींवर भाष्य केलं. संसदेच्या आत आणि बाहेर आपण एकीने बोलण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.