दिल्ली : सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची यादी समोर आली आहे. 'पद्मश्री'च्या यादीत क्रिकेटपटू विराट कोहलीसह कुस्तीपटू साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारने अद्याप अधिकृतपणे यादी जाहीर केलेली नाही.


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी जाहीर होणार आहे. सध्या फक्त पद्मश्री पुरस्कारांची यादी मिळाली आहे. तर पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांची घोषणाही लवकरच केली जाणार आहे.

पद्मश्री पुरस्कारांमध्ये यावेळी क्रीडापटूंचं पारडं जड मानलं जात आहे. क्रिकेटमधील योगदानासाठी कॅप्टन विराट कोहलीला पद्मश्री जाहीर झाला आहे, तर जीम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिकला त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे.

पद्मश्री पुरस्कार यादी

  • श्रीजेश (हॉकी)

  • विकास गौडा (अॅथलिट)

  • भावना सोमय्या (फिल्म समीक्षक)

  • सी. नायर (नर्तक)

  • विराट कोहली (क्रिकेट)

  • साक्षी मलिक महिला (कुस्तीपटू)

  • दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)

  • अनुराधा पौडवाल (गायिका)

  • कैलाश खेर (गायक)

  • संजीव कपूर (शेफ)


 

पद्मश्री पुरस्कार

  • मीनाक्षी अम्मा - मार्शल आर्ट

  • चिंताकिंदी मल्लेशाम - विज्ञान

  • दरीपल्ली रमैया - समाजसेवा

  • बिपिन गणात्रा - समाजसेवा

  • डाॅ. सुनिती सोलोमाॅन - वैद्यकीय सेवा

  • डाॅ. सुब्रतो दास - वैद्यकीय सेवा

  • गिरीश भारद्वाज - समाजसेवा

  • सुकरी बोम्मागौडा - गायन

  • दीपा कर्माकर - क्रीडा

  • मरियप्पन थंगावेल - क्रीडा

  • अनंत अग्रवाल - शिक्षण आणि साहित्य