नवी दिल्ली : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस नेते अविनाश पांडे यांची दुसरी टर्म हुकली आहे. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचंही नाव मागे पडलं आहे.


 

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे.

 

या जागांसाठी काँग्रेसकडून पी.चिदंबरम, राष्ट्रवादीककडून प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपकडून पीयुष गोयल सध्या रिंगणात आहेत .

 

भाजपकडून आणखी दोन नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यापैकी एका जागेसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता असून तिसऱ्या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे.